12 भाषांची ऑनलाईन डिक्शनरी – लोकमत

एकिकडे मुद्रित माध्यमांमध्ये अशी घडामोड होत असताना संगणकीय भाषा आत्मसात केलेल्या सुनील खांडबहाले यांच्या  ‘खांडबहाले डॉटकॉम’ कडून १२ भाषांमधील १२ शब्दकोष सर्वासाठी खुले करण्याचा कार्यक्रम गंगापूर रोडवरील इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीच्या संगणक विभागात रंगला. १२ भाषेतील हा डिजीटल शब्दकोश मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तामिळ, तेलगु, कन्नड, मल्याळम्, पंजाबी, बंगाली, संस्कृत आणि उर्दू भाषेत khandbahale.com या संकेत स्थळावर सर्वासाठी मोफत उपलब्ध झाला आहे. नोकियाचे माजी उच्च अधिकारी ग्रेगोरी स्माईली, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी रवि आंधळे, महापालिकेचे माजी आरोग्य अधिकारी के. एम. सोनवणे, आयएमआरटी महाविद्यालयाचे संचालक डी. डी. वाळके, छायाचित्रकार प्रसाद पवार, प्रसिध्द कापूस शिल्पकार राजेंद्र खैरनार, प्रसिध्द कवि-लेखक संतोष हुदलीकर, एआयएलएसजीचे क्षेत्रिय संचालक प्रकाश पानगम, डिजीटल डिझायनर दिनेश पैठणकर, एनबीटी लॉ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य आणि स्वत: सुनील खांडबहाले या १२ जणांनी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी संगणकाची कळ दाबून १२ शब्दकोष सर्वासाठी खुले केले.

Sidebar