The power of ‘Open-Data’

In developing countries, daily life challenges like interrupted power supply, shortage of water, sudden change of traffic routes, shortage of blood in blood banks, shortage of cash in banks and ATMs, unpredicted schedule of public transport system and many others are known. But citizen’s life could be better if they are informed upfront about what-where-when. In developed countries, citizens are much organized due to the availability and access to the real time information they needed. It has become possible due to ‘open-data-initiatives’. Open data is the data which is freely made public and accessible to everyone to use and republish as they wish, without restrictions from copyright, patents or other mechanisms of control by government, private and social organizations. The key objectives of open data initiatives are to make optimum utilization of national resources, to strengthen economic growth, to improve the quality of public service, to increase economic value, to bring transparency in system, to create government responsibility by enabling communication between citizens and administration. This process not only helps citizens and business but also to government through deep-data-learning. Good news is that more than half of countries worldwide have recognized the importance of open data and they are practicing to make their citizens life better. Indian government is good example which has adopted and is promoting open data initiatives aggressively. Through https://data.gov.in/ the data of over fifty thousand resources of four thousand topics from 103 departments are made open to public. The policy has encouraged many data-driven startups nationwide. The ‘wisdom of the crowd’ has a great impact due to social media and the revolution of information technology. The crowd-sourced success stories like Waze, Google maps, Wikipedia, Linux, Firefox, Airbnb, Lego etc. has inspired open data policies to solve more complex challenges in recent time, creating new job opportunities in the field of data analysis, data visualization and data journalism. With the help of available data, local entrepreneurs, students and scientists are solving local challenges by organizing hackathons, workshops, seminars, brainstorming sessions and national conferences. Rapid urbanization, poverty, inequality, climate change, unemployment , corruption , health and education like global issues are more clear on world map due to open data initiatives policies. Global organizations like United Nations, UNESCO, World Bank, high-tech companies like Google, Facebook and many others are mobilizing global human capital to create solutions for complex challenges and educate people about sustainable and inclusive development by offering their resources and technologies. The process of smart cities can be accelerated by adopting standard open data policies, legally and technically. Local administration can leverage from the local human capital and resources, creating new job opportunities and disruptive solutions. Citizens can be make smarter by giving them access to real time information through data driven apps and services. आज नळाला पाणी आलेच नाही, रेल्वे नियोजित वेळेपेक्षा काही तास उशिराने धावतेय, शहर वाहतुकीचा मार्ग अचानक बदलला, रक्तपेढीत हव्या त्या रक्तगटाचे रक्त शिल्लक नाही, किरकोळ दुरुस्तीसाठी काही काळ वीजपुरवठा खंडित झाला, आज कार्यालयाला सुट्टी आहे, साहेब रजेवर आहेत, बँकेत रोकडच शिल्लक नाही अशा एक ना अनेक गोष्टी आपल्यासाठी नवीन नाहीत. भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या आणि नाना वैविध्य असलेल्या देशात काही अडचणी आपणही समजू शकतो परंतु कुठलीही पूर्वसूचना न मिळता अशा संकटांचा सामना करावा लागणे हे किती क्लेशदायक असते हे आपल्याला वेगळे सांगावयास नको. आपल्या शहरातील घडामोडी तसेच कधी-कुठे-काय नियोजित आहे याची अचूक माहिती मिळाल्यास, नागरिकांचे जीवन सुखकर होण्यास मदत होते. पाश्चिमात्य देशांमध्ये नागरिक त्यांच्या एक-एक सेकंदाचे नियोजन करू शकतात. त्यांना ते सहज शक्य आहे कारण यंत्रणेने तसेच तेथील नागरिकांच्या उत्स्फूर्त योगदानातून त्यांना सभोवतालच्या घडामोडींची तसेच मूलभूत सोयीसुविधांची इत्यंभूत माहिती उपलब्ध असते. त्याचे कारण म्हणजे ‘ओपन-डेटा-इनिशिएटिव्ह’ अर्थात ‘मुक्त-आधारभूत माहिती-उपक्रम’. ‘ओपन-डेटा’ किंवा ‘मुक्त-आधारभूत माहिती’ म्हणजे अशी माहिती जी सरकारी, निमसरकारी, सेवाभावी तसेच खाजगी संस्थांद्वारे अधिकृत संकेतस्थळांवर नियमित प्रकाशित केली जाते आणि जी जनहितार्थ विनानिर्बंध सार्वजनिक केलेली असते. ‘ओपन-डेटा’ चा मूळ उद्देश राष्ट्रीय संसाधनांचा इष्टतम उपयोग, आर्थिक अभिवृद्धी, लोकसेवेचा दर्जा, क्रयशीलता, आर्थिक मूल्य सुधारणे यांसोबतच सरकारी उत्तरदायित्व निर्माण करणे व नागरिक आणि प्रशासन यातील संवाद वाढवून सरकारी कामकाजात पारदर्शकता निर्माण करणे असा असतो. ज्याचा फायदा केवळ संस्था व नागरिक यांनाच नाही तर ‘डीप-डेटा-लर्निंग’ म्हणजे माहिती-आदानप्रदान प्रभावाचा सखोल अभ्यास करून नवनवीन लोककल्याणकारी योजना आखण्यासाठी खुद्द सरकारलाही होत असतो. आनंदाची गोष्ट म्हणजे आजमितीला जगभरातील निम्म्याहून अधिक देशांनी ह्या खुल्या माहितीच्या धोरणाचा पुरस्कार केला आहे आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत सरकार देखील यात अग्रेसर आहे.  भारत सरकारद्वारा डेटा.जीओव्ही.इन ( https://data.gov.in ) या अधिकृत संकेतस्थळामार्फत केंद्र सरकारच्या १०३ विभागांच्या सुमारे पन्नास हजार संसाधनांच्या चार हजारहुन अधिक विषयसूची अहवाल उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. ह्या उपलब्ध माहितीवर आधारित देशातील अनेक तरुण स्वतःच्या स्टार्टअप्स सुरु करत आहेत. सोशल मेडिया व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वाना ‘विस्डम ऑफ क्राउड’ चे महत्व समजले आहे. ‘विस्डम ऑफ क्राउड’ म्हणजेच ‘जनशक्तीचे एकत्रित ज्ञान’ अर्थात जटील समस्यांच्या निराकारणाचा प्रयत्न एकट्या-दुकट्या व्यक्तीने, संस्थेने अथवा समुदायाने करण्यापेक्षा व्यक्तिगत स्वरूपात जगभर विखुरलेले जे ज्ञान व कौशल्य आहे यांच्या एकत्र प्रयत्नाने सर्वसमावेशक असे प्रभावी उत्तर शोधण्यावर अनेक देश सध्या भर देत आहेत. विविध वाहतूक मार्गांवरील वाहनांच्या गर्दीची प्रत्यक्षदर्शी स्थिती कळावी यासाठी  लोकसहभागातून तयार झालेले ‘वेज’ नावाचे अँप, नकाशांसाठी प्रसिद्ध गुगल मॅप्स, मुक्त व मोफत ज्ञानकोश म्हणजे विकिपीडिया, संगणक प्रणाली लिनक्स, मोझिला फायरफॉक्स वेब ब्राउजर, जगप्रसिद्ध खेळण्यांची कंपनी लेगो, एअरबी अँड बी अश्या यशस्वी क्राउड-सोर्स्ड उदाहरणांतून प्रभावित होत ‘ओपन-डेटा’ धोरण पक्के होत गेले.  प्रगत राष्ट्रांमध्ये ‘ओपन-डेटा’ व ‘विस्डम ऑफ क्राउड’ च्या माध्यमातून सामाजिक संशोधन व समाजोपयोगी तंत्रज्ञान निर्मितीस बळ मिळत आहे. त्यामुळे डेटा-विश्लेषण, डेटा सादरीकरण, डेटा-पत्रकारिता हि क्षेत्रे वाढीस लागत आहे.  तेथील प्रशासन डेटा-एपीआय अर्थात माहिती-संवाद-यंत्रणा देऊ करत नागरिकांच्या सहभागातून स्थानिक प्रश्न सोडवण्याच्या उपाययोजना करत आहेत. उपलब्ध माहितीच्या आधारे देशातील तरुण विद्यार्थी, तंत्रज्ञ  व उद्योजक दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी ‘डेटा-ड्रिव्हन-टेकनॉलॉजि-सोल्युशन्स’ अर्थात माहिती आधारित तंत्रज्ञान सुविधा निर्माण करत आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमधून विविध कार्यशाळा (हॅकेथॉन), शिबिरे, चर्चासत्रे व परिषदा आयोजित केल्या जातात. बदलते वातावरण, वाढते तापमान, शिक्षण आणि आरोग्य, असमानता, गरिबी, वाढता भ्रष्टाचार व बेरोजगारी यांसारख्या जागतिक प्रश्नांसाठी अनेक देश आपली माहिती व आकडेवारी जनहितार्थ प्रसारित व सार्वजनिक करत आहेत. युनायटेड नेशन्स हि संस्था जागतिक मानवी कौशल्य कार्यान्वित करून मोठ्या स्तरावर जागरूकता व लोकशिक्षण सारखे उपक्रम राबवत आहे. यासोबतच गुगल, फेसबुक सारख्या कंपन्या देखील आपले तंत्रज्ञान नवतरुणांना देत ओपन-डेटा च्या माध्यमातून रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करण्यास मदत करताना दिसतात. आपल्या नाशिकचा स्मार्ट सिटी यादीत समावेश झाला आहे हि आनंदाची बाब. स्मार्ट सिटी निर्मिती प्रक्रियेत सिटीझन्स अर्थात नागरिकही स्मार्ट होणं तितकंच महत्वाचं. त्यादृष्टीने नागरिकांचा उत्स्फूर्त  सहभाग मिळाल्यास ‘ओपन-डेटा’ च्या माध्यमातून आपण सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. शहरातील तरुणांच्या मदतीने कल्पक योजना राबवता येऊ शकतात. शहरातील विविध नागरिक सुविधा इ-गव्हर्नन्सच्या माध्यमातून डिजिटलाइज्ड करताना स्थानिक प्रशासनही लोकोपयोगी माहिती अद्ययावत ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील दिसते आहे. आपल्या शहरातील २ राज्यस्तरीय विद्यापीठं, ४६ अभियांत्रिकी महाविद्यालयं, ८२ व्यावसायिक, विज्ञान आणि इतर महाविद्यालयं यातून दरवर्षी बाहेर पडणारी हजारो-लाखो पदवीधर आणि सातपूर, अंबड, गोंदे, दिंडोरी, सिन्नरची माळेगाव-मुसळगाव औद्योगिक वसाहत तसेच शहरातील विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योग-व्यावसायिक आणि विषयतज्ञ यांचा विचार करता भविष्यामध्ये समाजोपयोगी नवकल्पक तंत्रज्ञान निर्मितीत नाशिकचे योगदान खूपच आशादायी आहे.

published url at Maharashtra Times : http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=14012017005010# Or read at : http://sunilsunilkhandbahale.com/the-power-of-open-data/
Sidebar