Technology path forward to sustainable growth

Imagine homes in the sky, on the sea surface or even under the water, flying cars, reality beyond virtual reality (VR) to see your relatives and friends not only on computer screen but right next to you. And yes, you can expect to  live healthy life for thousands of year. Does it sound like exaggeration? But no wonder if turns into reality since many scientists around the world are working hard to make the impossible possible in near future. This is information technology age. Data is being generated at light speed. Over 2.5 Quintilian new data is getting added on daily basis. Undoubtedly, this has helped accelerating innovation. Year 2015 and 2016 has been effective in giving amazing futuristic technologies to satisfy increasing needs of mankind. 

Year 2015 began with Facebook’s solar panel based Internet  connectivity airplane project, followed by discovery of algae based jelly to stop bleeding in less than 12 seconds during accident or surgery, 3d printed medicine tablet, invention of the cement that could absorb 3 thousand liters of water in a minute to avoid flood like situations, energy generation from human waste, technology to decode DNA, anti-Ebola vaccine, prophylactic mosquito, a car that could be converted to airplane and a 5 dollar computer was a big hit at the end of the year.

Similarly, year 2016 was equally important for futuristic technologies. By year 2020, it is expected to connect over 30 billion Internet devices to each other. The world would be super interconnected and depend on massive information exchange. Nano-sensor technology will boost agriculture, medical, architecture industry. 24×7 reliable and Eco-friendly renewable energy will be possible through aluminum, zinc and sodium based batteries, autonomous vehicles i.e. self driving cars can not only avoid accidents but improve human lives especially of  handicapped and elderly people, wireless charging technology can keep devices running forever, conversational interfaces, robots will teach robots, personalize air purifiers, organ on chips, realistic dolls, artificial pancreas, floating products etc. are the top innovations of year 2016.

Rapid urbanization is a global challenge. We must optimize our cities before it becomes too crowded and out of control. Technology is the answer. Worldwide countries are focusing on technology for sustainable and organized growth of cities. Technology awareness and education can play a key role in making citizens smarts and ready for smart cities. In next few articles, lets find our few amazing global technology innovations and brainstorm about how we can possibly implement them in local context to solve local challenges. … to be continued …

विचार करा कि आपली घरं आता फक्त जमिनीवरच नाही तर समुद्रात आणि आकाशात देखील असतील, विनावाहक मोटारगाड्या फक्त रस्त्यावरच चालताना नाही तर आकाशातही उडताना दिसतील, हजारो मैल असलेले आपले आप्तस्वकीय फक्त संगणकाच्या पडद्यावरच नाहीत तर अगदी आपल्या जवळ असलेली भासतील आणि एवढंच नाही तर तुम्ही हजारो वर्ष निरोगी आयुष्यमानाचीही अपेक्षा धरू शकता. अतिशयोक्ती वाटते ना? पण हे नजीकच्या काळात प्रत्यक्षात आल्यास आश्चर्य वाटू नये. कारण जगभरात असेच एक ना अनेक प्रयोग यशस्वी करण्यात कैक शास्त्रज्ञ अहोरात्र झटत आहेत. आताचे युग हे माहितीच्या आदानप्रदानाचे युग आहे हे वेगळे सांगावयास नको. २.५ क्वेन्टीलियन डाटाची निर्मिती दर दिवसाला होत आहे. दररोज निर्माण होणारा हा डाटा इतका मोठा आहे की जगभरात असलेला ९० टक्के डाटा केवळ मागील दोन वर्षात निर्माण झाला आहे. बिग-डाटा च्या प्रभावामुळेच संशोधनाची गती वाढण्यास नजीकच्या काळात मदत झाली आहे. मानवाच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी संशोधनाच्या दृष्टीने वर्ष २०१५ व २०१६ हि खूपच महत्वाची ठरली. वर्ष २०१५ च्या सुरुवातीस फेसबुक कनेक्टीविटी उपक्रमांतर्गत सौरउर्जाचलित इंटरनेट विमान,  त्या नंतर गंभीर अपघाताच्या वेळी अथवा शस्त्रक्रिया करताना केवळ १२ सेकंदात रक्तस्त्राव थांबवू शकेल अशा शेवाळ आधारित जेलचा शोध, जिभेवर ठेवताच तत्काळ विरघळणारी ३ डी प्रिंटेड औषधी गोळी, अतिवृष्टीच्या परिस्थितीत जलप्रलय टाळता यावे यासाठी १ मिनिटात ३००० लिटर पाणी शोषणारे सिमेंट, मानवी मलमूत्रापासून शुद्ध पाणी आणि उर्जानिर्मिती, डीएनए मध्ये आवश्यक बदल घडवणारा शोध ज्यामुळे जीनोममध्ये संभाव्य आजाराचा नको असलेला कोड काढून त्या जागी नवीन कोड बसवला जातो, इबोला रोगप्रतिबंधक लस, रोगप्रतिबंधक डास, कार मध्ये परावर्तीत होणारे विमान यांसह वर्ष २०१५ च्या सरतेशेवटी केवळ ५०० रुपयांत संगणक निर्मितीचे संशोधन सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले. त्याचप्रमाणे वर्ष २०१६ देखील अनेक भविष्यवेधी संशोधनाच्या दृष्टीने कलाटणी देणारे राहिले. इंटरनेट ऑफ थिंग्ज च्या प्रभावामुळे २०२० पर्यंत साधारणतः ३ हजार कोटी साधने एकमेकांना जोडली जाण्याचा अंदाज आहे. येणाऱ्या काळात जग माहितीच्या आदानप्रदानावरच आधारित व अनुषंगिक स्वरूपाचे असेल. मानवी शरीर तसेच बांधकाम वस्तूंमध्ये नॅनोसेंसर स्थापित करून वैद्यकीय, शेती, स्थापत्य व औषधनिर्मिती क्षेत्रात मोठी प्रगती होऊ शकेल. सोडियम, झिंक आणि अल्युमिनियम आधारित बॅटरी मुळे पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि २४ तास खात्रीशीर वीज मिळू शकेल अशी अक्षयऊर्जा निर्मिती शक्य झाल्याने दुर्गम भागातील खेडीपाडीही प्रकाशमय होण्याची आशा निर्माण झाली आहे. ऑटोनॉमस व्हेईकल अर्थात सेल्फ-ड्रायव्हिंग कार क्षेत्रात अनेक कंपन्यांनी रस घेतला असून त्यामुळे अपघात तसेच संभाव्य जीवितहानी टाळणे, प्रदूषण निर्मूलन व जेष्ठ तसेच दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुखकर होण्यास मदत होणार आहे. सभोवतालच्या वाय-फाय तसेच दूरभाष लहरींच्याद्वारे आपली इंटरनेट व इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युतभारित करणे शक्य आहे. भविष्यात इमारती, रस्ते, गाड्या आपल्याशी मानवाप्रमाणे संवाद करू लागल्यास आश्चर्य वाटू नये. रोबोट्स रोबोट्सला शिकवतील, धुळीच्या प्रदूषणापासून मुक्त होण्यासाठी व्यक्तिगत हवा-शुद्धक यंत्र, संततीहीन जोडप्यांसाठी अगदी खऱ्या वाटाव्यात अशा भावनायुक्त बाहुल्या, ऑर्गन-ऑन-चिप, वाढत्या मधुमेही रुग्णांची संख्या लक्षात घेता रक्तातील साखर नियंत्रणासाठी स्वयंचलित कृत्रिम स्वादुपिंड, स्पर्शविरहित तापमापक, भुकंप-रोधक बिछाना, घडी घालता येईल ल असे दुचाकी शिरस्त्राण (हेल्मेट), विजेच्या दिव्यांसह अनेक हवेत तरंगती उत्पादने असे बरेच काही भविष्यवेधी तंत्रज्ञान वर्ष २०१६ ने जगाला दिली.

वाढते शहरीकरण हे एक जागतिक आव्हान आहे. माणसे, प्राणी, कचरा, इमारती व वाहनांच्या भाऊगर्दीमुळे आणि अपुऱ्या संसाधनांमुळे शहरं विद्रुप तर सुविधा क्लेशदायक ठरत आहेत. यावर निश्चित उत्तर म्हणजे तंत्रज्ञान. शहरी जीवनमान सुसह्य करण्यासाठी जगभर तंत्रज्ञानाचा नियोजनबद्ध वापर करण्यावर आता जोर दिला जात आहे. शहरे स्मार्ट करण्याबरोबरच शहरातील नागरिकही स्मार्ट कशी होतील यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल जनप्रबोधन करणेही तितकेच महत्वाचे. त्यादृष्टीने ‘महाराष्ट्र टाइम्स’ कडून तंत्रज्ञान विषययावर लेखमला लिहिण्यासाठीची मला विचारणा झाली. त्याबद्दल ‘मटा’ चे आभार. मी गेली एक-दिड वर्ष अमेरिकेत वास्तव्यास असताना आणि तेही फेसबुक, गुगल, एमआयटी सारख्या तंत्रज्ञानाच्या पंढरीत वावरतांना तंत्रज्ञानात होणारे बदल  मला अगदी जवळून अनुभवता आले. पाश्चिमात्य राष्ट्रांची सरकारी धोरणं, तेथील नागरिकांची मानसिकता, पुरेशे प्रशिक्षित मनुष्यबळ, भक्कम पायाभूत सुविधा आणि अद्ययावत संसाधनं हि सगळीच कशी त्यांच्या विकासासाठी पूरक आहेत याचा अभ्यास करता आला. आपल्याकडेही प्रयत्नांती ते सहज शक्य आहे. माझ्यामते ‘समस्या’चेच दुसरे नाव ‘संधी’. पुढील काही लेखांत बघुयात जागतिक तंत्रज्ञानाचे अद्भुत अविष्कार आणि आपण सर्व मिळून विचार करूयात कि आपल्याकडे स्थानिक समस्या निराकरणासाठी त्यांचा कसा अंगीकार करता येऊ शकेल. लेखमालेच्या या एकत्रित प्रवासात कृपया आपल्या प्रतिक्रिया, विचार तसेच सूचना जरूर कळवा.

published url at Maharashtra Times : http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=07012017009015
Sidebar