योग्य निर्णय कसा घ्यावा? – स्वामी विवेकानंद
विचार करा कि तुम्ही एकांतात एखादे कृत्य करणार आहात आणि ते करू कि नको याबद्दल तुमच्या मनांत शंका आहे. पाशवी मन म्हणते कर, इथे कोण आहे बघायला. तर दैवी मन सांगत असते नको करुस. तू एक चांगली व्यक्ती आहे. हे तू करू नकोस.
स्वामी विवेकानंद सांगतात की अशा प्रसंगी योग्य निणर्य घेणे अतिशय सोपे आहे.
१. अशी कल्पना करा की एका कोपऱ्यातून तुमची आई ते कृत्य करताना तुम्हाला पाहत आहे. तिला, तुम्ही जे कृत्य करत आहात ते बघताना तुमच्याबद्दल अभिमान वाटत असेल तर ते कृत्य जरूर करा आणि जर तिला तुमची लाज वाटत असेल, तिची मान जर शरमेने खाली जात असेल तर ते कृत्य बिलकुल करू नका.
२. अशी कल्पना करा की तुमचा मुलगा किंवा मुलगी ते कृत्य करताना तुम्हाला पाहत आहे. त्याला किंवा तिला, तुम्ही जे कृत्य करत आहात ते बघताना तुमच्याबद्दल अभिमान वाटत असेल तर ते कृत्य जरूर करा आणि जर त्याला किंवा तिला तुमची लाज वाटत असेल तर ते कृत्य बिलकुल करू नका.
आणि विवेकानंद पुढे सांगतात की, ह्यानंतरही तुम्हाला योग्य निर्णय घेता येत नसेल तर तुम्ही माणूस म्हणून घ्यायला ‘नालायक’ आहात.