हाय-टेक वे फॉरवर्ड

हाय-टेक वे फॉरवर्ड, सुनील खांडबहाले यांनी लिहिलेले भविष्यवेधी तंत्रज्ञानविषयक पुस्तक
हाय-टेक वे फॉरवर्ड, सुनील खांडबहाले यांनी लिहिलेले भविष्यवेधी तंत्रज्ञानविषयक पुस्तक

मानवाने आपल्या बुद्धीसामर्थ्याच्या जोरावर यंत्र बनवलं. आता यंत्रच स्वतःहून प्रगत यंत्र बनवत आहेत. त्यासाठी उपलब्ध माहिती, पूर्वानुभव आणि पुर्वानुमान यांचा प्रभावी वापर यंत्र करत आहेत. याच प्रक्रियेला “कृत्रिम बुद्धिमत्ता” अर्थात “आर्टीफिसियल इंटेलीजंस” संक्षिप्तरूपाने ‘ए.आय.’ म्हणतात. संगणक शास्त्रात “कृत्रिम अथवा यांत्रिक” अशी संबोधली जाणारी बुद्धिमत्ता मानवी नैसर्गिक बुद्धिमत्तेचा पुढचा टप्पा सिद्ध होऊ पाहत आहे. खरे तर ‘ए.आय.’ चे नामकरण झाले १९५६ मध्ये. तसे त्याचे बिज़ारोपण १९५० मध्येच जटिल समस्या सोडवण्यासाठी व सांकेतिक पद्धतिसाठी आणि पुढे १९६० मध्ये अमेरिकी संरक्षण विभागाने तर १९७० मध्ये दारपा (DARPA) रस्ते नाकाशा निर्मितिसाठी, जो पुढे २००३ मध्ये स्वियसहाय्यक यंत्रणा म्हणुन वापरला गेला. आधुनिक तंत्रज्ञानाने मानवी जीवन उतरोत्तर सुसह्य बनविले आहे. हॉलीवुड-बॉलीवुड सिनेमांमध्ये अतिरेकाने मनोरंजनात्मक भ्रामक कल्पना दाखवितात तसे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विघातक नक्कीच नाही. ते जगाचे उज्वल भविष्य घडू पाहत आहे. विचार करा कि आपली घरं आता फक्त जमिनीवरच नाही तर समुद्रात आणि आकाशात देखील असतील, विनावाहक मोटारगाड्या फक्त रस्त्यावरच चालताना नाही तर आकाशातही उडताना दिसतील, हजारो मैल असलेले आपले आप्तस्वकीय फक्त संगणकाच्या पडद्यावरच नाहीत तर अगदी आपल्या जवळ असलेली भासतील आणि एवढंच नाही तर तुम्ही हजारो वर्ष निरोगी आयुष्यमानाचीही अपेक्षा धरू शकता. भविष्यातील इंटरनेटमध्ये फक्त पृथ्वीवरील मानव, वस्तू आणि संसाधनेच नाही तर चंद्र, मंगळ किंबहुना संपूर्ण गॅलेक्सी जोडण्याचे सामर्थ्य असणार आहे. अतिशयोक्ती वाटते ना? पण हे नजीकच्या काळात प्रत्यक्षात आल्यास आश्चर्य वाटू नये! कारण..


28 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या विशेष प्रसंगी सुनील खांडबहाले लिखित "हाय-टेक वे फॉरवर्ड" या पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रतिष्ठित शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रख्यात शिक्षणतज्ञ श्री. विवेक सावंत.
28 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या विशेष प्रसंगी सुनील खांडबहाले लिखित “हाय-टेक वे फॉरवर्ड” या पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रतिष्ठित शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रख्यात शिक्षणतज्ञ श्री. विवेक सावंत.

भविष्यात तंत्रज्ञान कसे बदलत जाईल? त्याचा जनसामानाव्यावर कसा प्रभाव पडेल? कोणते व्यवसाय, उद्योगधंदे कालबाह्य होतील? रोजगार-व्यवसाय विषयक कोणत्या नवनवीन संधी निर्माण होतील? यावर हाय-टेक वे फॉरवर्ड या पुस्तकात भाष्य करण्यात आले आहे. सुनील खांडबहाले यांनी गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन सारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांबरोबरचे आपले अनुभव, देश-विदेशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचा अभ्यास यावर आधारित “हाय-टेक वे फॉरवर्ड” पुस्तकात जगभरातील महत्वाच्या समस्या, त्यावर आधारित संशोधने आणि स्टार्टअप्स यांची उदाहरणे, यशस्वी तसेच अयशस्वी केस स्टडीज यांचा संदर्भ दिला आहे. विविध क्षेत्रातील विद्यार्थी, तंत्रज्ञ, नवोन्मेषक, उद्योजक, धोरणी, शासन, प्रशासक यांनी बदलत्या तंत्रज्ञानासोबत सर्वांगीण विकासासाठी कशी वाटचाल करावी, २१ शतकातील आधुनिक युगात प्रत्येक युवकाने हे पुस्तक जरूर वाचावे कारण भारतीय युवकांनी नोकरीचा शोध घेण्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या समस्यांचे संधीत कसे रूपांतर करावे व नवीन रोजगार निर्मिती कशी करावी यासाठी “हाय-टेक वे फॉरवर्ड” हे सुनील खांडबहाले यांनी लिहिलेले पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल असा विश्वास डॉ. श्री. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केला. 

Sidebar