मुलांशी बोलावे कसे? त्यांना ऐकावे कसे?

“तिळगुळ घ्या, गोडगोड बोला…”

गोड, वात्सल्य, आस्था आणि प्रेमाने संवाद करायला शिकवणारी आपली भारतीय संस्कृती. तरीदेखील आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या जगात आपल्या जाणत्या-अजाणत्या बोलण्या-वागण्यामुळे जवळचे मित्र, सहकारी, नातेवाईक, कुटुंबीय प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दुखावले जातात, दुरावले जातात. आणि याचे मूळ आहे ते कौटुंबिक संभाषणात. पालक या नात्याने आपल्या मुलांशी संवाद साधताना आपण जे शब्द वापरतो, ज्या पद्धतीने वापरतो, त्याचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो आणि त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्व घडत असते. मुलांशी आपण बोलावे कसे? त्यांना ऐकावे कसे? याविषयी जाणून घ्या प्रसिद्ध बाल-मनोवैज्ञानिक श्रीमती शेलजा सेन आणि सिनेअभिनेता शाहरुख खान यांचे विचार.

  https://www.ted.com/talks/shelja_sen_how_to_talk_and_listen_to_your_children

।। आपणास व आपल्या परिवारास मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ।।
– सुनील खांडबहाले आणि परिवार

Sidebar