‘हाय- टेक वे फॉरवर्ड’ हे सुनील खांडबहाले यांनी लिहिलेले पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल – डॉ. रघुनाथ माशेलकर
‘हाय- टेक वे फॉरवर्ड’ हे सुनील खांडबहाले (Pune) यांनी लिहिलेले पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल, असा विश्वास डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केला. विविध क्षेत्रातील विद्यार्थी, तंत्रज्ञ, नवोन्मेषक, उद्योजक, धोरणी, शासन, प्रशासक यांनी बदलत्या तंत्रज्ञानासोबत सर्वांगीण विकासासाठी कशी वाटचाल करावी, 21 शतकातील आधुनिक युगात प्रत्येक युवकाने हे पुस्तक जरूर वाचावे कारण भारतीय युवकांनी नोकरीचा शोध घेण्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या समस्यांचे संधीत कसे रूपांतर करावे व नवीन रोजगार निर्मिती कशी करावी, यावर या पुस्तकात भर देण्यात आला आहे, असेही माशेलकर यांनी सांगितले.
अमेरिकेच्या एम.आय.टी. विद्यापीठाचे पदवीधर, आयटी तज्ज्ञ संशोधक व भारतीय 22 राजभाषांचे डिजिटल शब्दकोशकार सुनील खांडबहाले लिखित “हाय-टेक वे फॉरवर्ड” या भविष्यवेधी नवकल्पक तंत्रज्ञान विषयक इंग्रजी व मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन 28 फेब्रुवारी या जागतिक विज्ञान दिनाच्या निमित्ताने थोर शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि शिक्षणतज्ञ विवेक सावंत यांच्या हस्ते नाशिक येथे झाले.
यावेळी मविप्र संस्थेचे सरचिटणीस ऍड. नितीनजी ठाकरे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते. भविष्यात तंत्रज्ञान कसे बदलत जाईल? त्याचा जनसामान्यांवर (Pune ) कसा प्रभाव पडेल? कोणते व्यवसाय, उद्योगधंदे कालबाह्य होतील? रोजगार-व्यवसाय विषयक कोणत्या नवनवीन संधी निर्माण होतील? यावर हाय-टेक वे फॉरवर्ड या पुस्तकात भाष्य करण्यात आले आहे.
सुनील खांडबहाले यांनी गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन सारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांबरोबरचे आपले अनुभव, देश-विदेशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचा अभ्यास यावर आधारित “हाय-टेक वे फॉरवर्ड” पुस्तकात जगभरातील महत्वाच्या समस्या, त्यावर आधारित संशोधने आणि स्टार्टअप्स यांची उदाहरणे, यशस्वी तसेच अयशस्वी केस स्टडीज यांचा संदर्भ दिला आहे.
मूळ बातमी प्रसिद्ध https://mpcnews.in/pune-the-book-high-tech-way-forward-written-by-sunil-khandbahale-can-be-a-guide-dr-raghunath-mashelkar-407522/