कोऽहम् या सुनील खांडबहाले लिखित इन्फोग्राफिक्स इंग्रजी व मराठी पुस्तकाचे प्रकाशन

‘स्व’च्या पद्धतशीर आणि वैज्ञानिक चौकशीवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण नकाशांसह, सुनील खांडबहाले यांनी लिहिलेले, कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ या इन्फोग्राफिक्स इंग्रजी व मराठी पुस्तकाचे भारतीय ‘परम’ या सुपर-कम्प्युटरचे जनक पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते प्रकाशन मंगळवार, दिनांक २८ मे २०२४ रोजी महिरावणी, नाशिक येथे झाले.  

कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ या सुनील खांडबहाले लिखित इंग्रजी व मराठी पुस्तकाचे डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते प्रकाशन

मंगळवार, मे २८, २०२४:  Divyabharathi Divya Bhaskar कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ या सुनील खांडबहाले लिखित इन्फोग्राफिक्स इंग्रजी व मराठी पुस्तकाचे डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते प्रकाशन

कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ हा मूलभूत प्रश्न, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या टप्प्प्यांवर, ह्या ना त्या कारणामुळे अनेकदा साद घालत असतो. परंतु याउलट – आपण स्वतःला सोडून, इतर सर्व बाह्य पद-पदार्थांचा अभ्यास करण्यात व्यस्त असतो आणि आपला ‘स्वयं’ चा अभ्यास करायचा मात्र राहून जातो. आपले खरे स्वरूप जर मानव ओळखेल, तर स्वतःबरोबरच इतर सर्व प्राणिमात्रांचेही जीवन अधिक सुंदर व सुखमय होऊ शकेल. असा विश्वास थोर शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी प्रकाशन करताना व्यक्त केला. नाशिकचे सुपुत्र, आयटी तज्ज्ञ संशोधक व भारतीय २२ राजभाषांचे डिजिटल शब्दकोशकार सुनील खांडबहाले यांनी अमेरिकेच्या एम.आय.टी. या जगप्रसिद्ध विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर श्रीक्षेत्र आळंदी येथे गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांच्याकडे गुरुगृही राहून साधकावस्थेत अध्यात्मिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी डॉ. विजय भटकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालत व त्याला तंत्रज्ञानाची जोड देत गुगल-मॅप्स प्रमाणे स्पिरिच्युऍलिटी-मॅप्स अर्थात अध्यात्मिक-नकाशे तयार केले. त्यातीलच एका मूलभूत विषयावर आधारित प्रत्येकास समजेल असे सोप्या शब्दांत, नकाशांसह कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ हे पुस्तक लिहिले. संत श्री. ज्ञानेश्वर माऊली बालसंस्कारशिबिर या कार्यक्रमप्रसांगी महिरावणी येथे डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते सदर पुस्तकाच्या इंग्रजी व मराठी भाषेतील प्रथम आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डब्ल्यूएनएसचे मुख्य प्रबंधक श्री. अरविंद कुलकर्णी, स्लाईडवेलचे मानवसंसाधन प्रबंधक श्री. अजय इप्पर, अनिसचे महाराष्ट्र राज्य प्रधान सचिव डॉ. टी.आर. गोराणे, एमकेसीएलचे नाशिक विभाग प्रमुख श्री. सुभाष पाटील, मुख्याध्यापक श्री. भदाणे, मुख्याध्यापक श्री. वसंत सालगुडे, प्रतिष्टित शेतकरी श्री. दिगंबर ढगे, श्री. शांताराम चव्हाण, सुनील खांडबहाले व त्यांचे आई-वडील सौ मीराबाई व श्री. शिवाजी खांडबहाले आणि पंचक्रोशीतील गावकरी, पालक व शिबिरार्थी विद्यार्थी उपास्थित होते. 

Sidebar