loksatta - Sunil KHANDBAHALE

News Articles

पं भीमसेन जोशींच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘संगीतसमय मैफल’ samaysangit.app

संगीत क्षेत्राला स्वरतेजाने प्रकाशित करणारे स्वरभास्कर, भारतरत्न प. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षाला ४ फेब्रुवारी २०२१ ला सुरुवात झाली. पंडितजींनी भारतीय संगीताला सर्वोच्च शिखरावर तर नेऊन पोहचवलेच परंतु अबाल-वृद्धांमध्ये संगीताविषयी गोडी निर्माण करून खऱ्या अर्थाने कानसेन असा संगीतप्रेमी-समाज घडवला. पंडितजींनी आयुष्यभर अविरत घेतलेला संगीतसेवेचा वसा संगणकयुगातही अव्याहत सुरु रहावा यासाठी पंडितजींच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त खांडबहाले.कॉम या भारतीय-राजभाषा-डिजिटल शब्दकोशांचे… read more »

ज्ञानेश्वरी आता इंटरनेट रेडिओद्वारे विश्वाला खुली

जगाच्या पाठीवर कोठेही २४ तास ज्ञानेश्वरी इंटरनेट रेडिओ ऐकता येणार आहे वारकरी संप्रदायासाठी नित्य पारायणाची असलेली पोथीबद्ध ग्रंथराज ज्ञानेश्वरी आता आधुनिकतेची कास धरत इंटरनेट रेडिओद्वारे विश्वाला खुली झाली आहे. ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक किसन महाराज साखरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून ही सुविधा जगभरातील सकलांसाठी २४ तास उपलब्ध झाली आहे. ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ असे ज्ञानेश्वर… read more »

संस्कृत इंटरनेट रेडिओ ऑनलाईन प्रक्षेपित

जगभरातील व्यापक लोकसहभागातून प्रक्षेपित केला जाणारा इंटेरनेटवरील हा सर्वप्रथम कम्युनिटी रेडिओ आहे. भाषा संवर्धनार्थ वेगळा प्रयोग नाशिक : ‘श्रवण‘ हे भाषा शिकण्याचे प्रथम आणि प्रभावी माध्यम. कोणतीही भाषा सतत कानावर पडल्याने त्या भाषेचे शब्द, उच्चार, उच्चारणपध्दती, व्याकरण याचे नकळत आकलन होते आणि हळूहळू ती भाषा आपसूकच ओठावर  येते. मग याला संस्कृत भाषा कशी अपवाद असेल? संस्कृत… read more »

बोली भाषांच्या दस्तावेजीकरणाची गरज – लोकसत्ता

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मराठी भाषेच्या समृद्धीसाठी करण्याच्या प्रयत्नांना चांगले यश मिळत असून त्यामुळेच भाषेविषयी सजगता निर्माण होण्यास निश्चित मदत होत आहे. भाषेमुळे संस्कृतीचे जतन होत असते आणि इतिहासाकडे बघण्याची दृष्टीही मिळते. आपली लोकभाषा, बोलीभाषा यांचे दस्तऐवजीकरण करण्याची गरज असून, त्यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा संगणक तज्ज्ञ सुनील खांडबहाले यांनी व्यक्त केली. मराठी भाषेच्या… read more »

बोली भाषांच्या दस्तऐवजांची गरज – लोकसत्ता

भारतासह साऱ्या जगात अनेक भाषा, बोली भाषा एकत्र नांदत आहेत. … जगभर पसरलेल्या, मराठीच्याच विविध बोली भाषांतून बोलणार्‍या आणि विविध राजकीय, सामाजिक मते असणार्‍या सर्वांना सामावून घेणारे .. Source: https://www.loksatta.com/vruthanta/need-of-documentation-of-dialects-sunil-khandbahale-233394/

खांडबहाले डॉट कॉम चा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव – लोकसत्ता

युनायटेड नेशन्स वर्ल्ड समित ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटीतर्फे “खांडबहाले डॉट कॉम‘ला मंथन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार दक्षिण आशिया खंडातील प्रादेशिक भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या उपक्रमाला दिला जातो.

खांडबहाले.कॉम च्या एसएमएस डिक्श्नरीला साऊथ एशिया सर्वोत्कृष्ट इन्होवेशन पुरस्कार – लोकसत्ता

नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल मोबाईल कॉंग्रेस अर्थात आंतरराष्ट्रीय भ्रमणध्वनी महासंमेलनात नाशिकच्या खांडबहाले डॉट कॉमच्या बहुभाषिय लघुसंदेश शब्दकोषाला शिक्षण आणि अध्ययन विभागात साऊथ एशिया बेस्ट मोबाईल इनोव्हेशन ऍवॉर्ड प्रदान करण्यात आला.विविध अकरा गटामध्ये हे पुरस्कार देण्यात आले. बांगलादेश, श्रीलंका, भूतान, मालदीव, अफगाणिस्तान, नेपाळ व हिंदुस्थानातील नामांकित कंपन्या स्पर्धेत सहभागी होत्या.

खांडबहाले एसएमएस शब्दकोशाची 75 हजारी मजल – लोकसत्ता

जगातील सर्वात पहिल्या एसएमएस शब्दकोशाची महती आता सगळीकडे पसरली आहे. अवघ्या महिन्याभराच्या कालावधीत ७५ हजारांपेक्षा अधिक जणांनी त्याचा लाभ घेतला आहे. यावरूनच त्याच्या लोकप्रियतेची साक्ष पटावी. एखाद्या शब्दाचा अचूक अर्थ जाणून घ्यावयाचा असल्यास ‘शब्दकोश’ची आठवण होते. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे शब्दकोश पाहायला मिळतात. मात्र आता शब्दकोश विकत घेण्याची गरज भासू नये, इतपत तंत्रज्ञान पुढे गेले… read more »

मोबाईल डिक्शनरी – लोकसत्ता

गरज असेल तेव्हा तात्काळ संदर्भ उपलब्ध व्हावा हा शब्दकोशाचा मूळ हेतू डोळ्यासमोर ठेवून कुठेही, कधीही सहजपणे वापरता येण्याजोगी जगातली सर्वप्रथम ‘इंग्लीश-मराठी मोबाईल डिक्शनरी’ नाशिक येथील खांडबहाले डॉट कॉमने विकसित केली आहे. विशेष म्हणजे, इंग्रजी व मराठी मिळून तब्बल दीड लाख शब्दसंपदा असणारी ही डिक्शनरी मोबाईल फोनच्या मेमरीतील अत्यंत कमी म्हणजे एखाद्या रिंगटोन एवढीच जागा व्यापते…. read more »

Sidebar