नाशिककरांना मिळाली पहिल्या लघुसंदेश शब्दकोशाची भेट – दिव्य मराठी
May 26, 2023
नाशिककरांना शुक्रवारी जगातील पहिल्या मराठी लघुसंदेश शब्दकोशाची देणगी मिळाली. सुनील खांडबहाले यांनी तयार केलेल्या या मोबाइल डिक्शनरीचे प्रायोगिक तत्त्वावर प्रकाशन करण्यात आले. कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सोसायटीच्या नाशिक शाखेचे चेअरमन मंगेश पिसोळकर, सेक्रेटरी राजेश सेठ, सचिव गिरीश पगारे व अन्य पदाधिकार्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.