लोकसत्ता - Sunil KHANDBAHALE

News Articles

मराठी भाषा स्पेलचेकर, नाशिकच्या सुनील खांडबहाले यांचे संशोधन – लोकसत्ता

मराठी शुध्दलेखनाविषयी अनेक प्रवाद आहेत. शुध्दलेखनात वेगवेगळी पध्दत अंगीकारली जात असल्याने नियम कोणते वापरावेत, असा प्रश्न अनेकांना पडतो. ही बाब लक्षात घेऊन येथील संगणकतज्ज्ञ सुनील खांडबहाले यांनी सुलभ पध्दतीने शुध्दलेखन तपासणीसाठी सहाय्यभूत ठरेल अशी खास ‘शुध्दलेखन तपासक संगणक प्रणाली’ विकसित केली आहे. कोणतेही प्रशिक्षण न घेता कोणालाही ही प्रणाली सहजपणे वापरता येईल. इंग्रजी ‘स्पेलचेकर’च्या धर्तीवर… read more »

बोली भाषांच्या दस्तावेजीकरणाची गरज – लोकसत्ता

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मराठी भाषेच्या समृद्धीसाठी करण्याच्या प्रयत्नांना चांगले यश मिळत असून त्यामुळेच भाषेविषयी सजगता निर्माण होण्यास निश्चित मदत होत आहे. भाषेमुळे संस्कृतीचे जतन होत असते आणि इतिहासाकडे बघण्याची दृष्टीही मिळते. आपली लोकभाषा, बोलीभाषा यांचे दस्तऐवजीकरण करण्याची गरज असून, त्यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा संगणक तज्ज्ञ सुनील खांडबहाले यांनी व्यक्त केली. मराठी भाषेच्या… read more »

बोली भाषांच्या दस्तऐवजांची गरज – लोकसत्ता

भारतासह साऱ्या जगात अनेक भाषा, बोली भाषा एकत्र नांदत आहेत. … जगभर पसरलेल्या, मराठीच्याच विविध बोली भाषांतून बोलणार्‍या आणि विविध राजकीय, सामाजिक मते असणार्‍या सर्वांना सामावून घेणारे .. Source: https://www.loksatta.com/vruthanta/need-of-documentation-of-dialects-sunil-khandbahale-233394/

खांडबहाले डॉट कॉम चा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव – लोकसत्ता

युनायटेड नेशन्स वर्ल्ड समित ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटीतर्फे “खांडबहाले डॉट कॉम‘ला मंथन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार दक्षिण आशिया खंडातील प्रादेशिक भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या उपक्रमाला दिला जातो.

खांडबहाले.कॉम च्या एसएमएस डिक्श्नरीला साऊथ एशिया सर्वोत्कृष्ट इन्होवेशन पुरस्कार – लोकसत्ता

नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल मोबाईल कॉंग्रेस अर्थात आंतरराष्ट्रीय भ्रमणध्वनी महासंमेलनात नाशिकच्या खांडबहाले डॉट कॉमच्या बहुभाषिय लघुसंदेश शब्दकोषाला शिक्षण आणि अध्ययन विभागात साऊथ एशिया बेस्ट मोबाईल इनोव्हेशन ऍवॉर्ड प्रदान करण्यात आला.विविध अकरा गटामध्ये हे पुरस्कार देण्यात आले. बांगलादेश, श्रीलंका, भूतान, मालदीव, अफगाणिस्तान, नेपाळ व हिंदुस्थानातील नामांकित कंपन्या स्पर्धेत सहभागी होत्या.

खांडबहाले एसएमएस शब्दकोशाची 75 हजारी मजल – लोकसत्ता

जगातील सर्वात पहिल्या एसएमएस शब्दकोशाची महती आता सगळीकडे पसरली आहे. अवघ्या महिन्याभराच्या कालावधीत ७५ हजारांपेक्षा अधिक जणांनी त्याचा लाभ घेतला आहे. यावरूनच त्याच्या लोकप्रियतेची साक्ष पटावी. एखाद्या शब्दाचा अचूक अर्थ जाणून घ्यावयाचा असल्यास ‘शब्दकोश’ची आठवण होते. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे शब्दकोश पाहायला मिळतात. मात्र आता शब्दकोश विकत घेण्याची गरज भासू नये, इतपत तंत्रज्ञान पुढे गेले… read more »

मोबाईल डिक्शनरी – लोकसत्ता

गरज असेल तेव्हा तात्काळ संदर्भ उपलब्ध व्हावा हा शब्दकोशाचा मूळ हेतू डोळ्यासमोर ठेवून कुठेही, कधीही सहजपणे वापरता येण्याजोगी जगातली सर्वप्रथम ‘इंग्लीश-मराठी मोबाईल डिक्शनरी’ नाशिक येथील खांडबहाले डॉट कॉमने विकसित केली आहे. विशेष म्हणजे, इंग्रजी व मराठी मिळून तब्बल दीड लाख शब्दसंपदा असणारी ही डिक्शनरी मोबाईल फोनच्या मेमरीतील अत्यंत कमी म्हणजे एखाद्या रिंगटोन एवढीच जागा व्यापते…. read more »

बोलणारा शब्दकोश – लोकसत्ता

भाषोत्पत्तीसारख्या विषयाचा शोध घेताना मनुष्याच्या विकासाचे आणि या विकासात भाषेचे महत्त्व अधोरेखित झाल्याशिवाय रहात नाही. आपल्या मुखाद्वारे आपण निरनिराळ्या प्रकारचे ध्वनी काढू शकतो, हे सामथ्र्य जेव्हा मानवाला कळले, तेव्हाच खरी भाषेची क्रांती झाली. आज जगातल्या अनेक भाषा आपल्याला त्या त्या देशाचा आणि तेथील लोकांच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगतात. पण जगात कोठेही गेलो तरी हा इतिहास वेगळा… read more »

मराठीची साथ करी इंग्रजीवर मात – लोकसत्ता

मराठी मुलं स्पर्धात्मक जगात केवळ इंग्रजी येत नाही किंवा इंग्रजीची भीती वाटते यामुळे मागे पडतात. इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास या मुलांमध्ये कमी असतो. असे का होते, याचा विचार केल्यावर खूप वेळा अनेक इंग्रजी शब्दांचे अर्थ माहीत नसल्यामुळे या मुलांची अडचण होते. ही अडचण लक्षात घेऊन या मुलांना त्यांच्याच मोबाईलवर दोन लाख इंग्रजी शब्दांचा अर्थ मराठीत सांगणारा… read more »

व्यक्तिवेध – सुनील खांडबहाले – लोकसत्ता

पारंपरिक पुस्तकी शब्दकोशाच्या मर्यादा तंत्रज्ञानाच्या आधारे होता होईतो कमी करायच्या आणि त्याचा लाभ अधिकाधिक जणांपर्यंत पोहचवायचा संकल्प नाशिकच्या सुनील खांडबहाले याने वयाच्या अवघ्या तिशीतच पूर्ण केला आहे.

Sidebar