SwayamTalks : संस्कृतीकडे नेणारी भाषा

चाकोरीबाहेर जाऊन स्वतःचा शोध घेतलेल्या ध्येयवेड्या व्यक्तींच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी अमृतयात्रा या संस्थेने स्वयं या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ही प्रेरणादायी व्याख्यानमाला झाली. ‘स्वयं’ या कार्यक्रमात जिद्दीची व ज्ञानाची गाथा उपस्थितांसमोर मांडण्यात आली. भारतीय भाषांमधील पहिल्या डिजिटल शब्दकोशाचे निर्माते सुनील खांडबहाले या ध्येयवेड्या मंडळींनी आपल्या प्रेरणादायी जीवनाचा पट उलगडून ठेवला.

Sidebar