गोदावरी.ऑर्ग तर्फे जन्मोत्सव सप्ताह
‘गोदावरीडॉटऑर्ग’ तर्फे जन्मोत्सव सप्ताह
नाशिक : माघ शुक्ल दशमी, १९ फेब्रुवारीला गोदावरी-जन्मोत्सवाचे औचित्य साधत, युवकांमध्ये गोदावरी जनजागृतीसाठी गोदावरीडॉटऑर्ग यांच्यातर्फे गोदावरी जन्मोत्सव सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाला मंगळवार (ता.१३) पासून सुरवात होणार आहे. सप्ताहांतर्गत गायन-वादन-नर्तन, पुस्तिका-निर्मिती, हस्ताक्षर लेखन, निबंध, प्रश्नमंजूषा, व्हिडिओ-निर्मिती, पाणीप्रश्नविषयक नवकल्पना अशा विविध राज्यस्तरीय स्पर्धा ऑनलाइन आयोजित केल्या आहेत. स्पर्धांसाठीची प्रक्रिया व नियम विषयक माहिती https://www.godavariaarti.org/या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धा विनामूल्य असून प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात प्रदान होणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन गोदावरीआरती. ऑर्गचे सुनील खांडबहाले केले आहे.

Birth Anniversary Week by ‘Godavari.org’
Nashik: On the occasion of Godavari Janmotsav on Magh Shukla Dashami, February 19, Godavari.org has organized Godavari Janmotsav Week to create awareness about Godavari among the youth. This week will start from Tuesday (13). Various state-level competitions such as singing, playing instruments, dancing, booklet-making, handwriting writing, essay, quiz, video-making, water-related innovations have been organized online under the week. Information about the process and rules for the competitions is available on the website https://www.godavariaarti.org/. The competition is free and each competitor will be provided with a participation certificate in digital form. Sunil Khandbahale of Godavari Aarti.org has appealed to more and more students to participate.

