ग्रेटभेट – मराठी भाषा आणि नवी माध्यमे
२७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन. हाच दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो. हा दिवस जवळ आला की माध्यमांमधून मराठी भाषेच्या सद्यस्थिती आणि भविष्याविषयी चर्चा, अग्रलेख, लेखमाला सुरु होतात. आपण ते सारं दरवर्षी वाचतो, आणि मराठी भाषा दिन सरला की लगेचच त्या सगळ्या वावटळीला पूर्णविराम दिला जातो.पण मित्रांनो, संकटात जो संधी शोधतो तोच खरा उद्योजक .. आपल्या मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी असाच एक आपल्या मराठी मातीत जन्मलेला उद्योजक पुढे आला, आणि त्याने मराठी भाषेला इंटरनेटच्या माध्यमातून जागतिक पातळीवर नेऊन पोचवले.’मराठी भाषा स्पेलचेकर’, ‘ऑनलाईन ज्ञानेश्वरी रेडीओ’ याचबरोबर ‘खांडबहाले डॉट कॉम’ या डिजिटल शब्दकोश निर्मितीसह अन्य अनेक अशा विक्रमी प्रकल्पांच्या माध्यमातून आज जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे *श्री. सुनील खांडबहाले* यांना भेटूया यंदाच्या ग्रेटभेट कार्यक्रमात!
#ग्रेटभेट – मराठी भाषा आणि नवी माध्यमे:- https://youtu.be/xhw-FPmCXR8