खांडबहाले.कॉम च्या एसएमएस डिक्श्नरीला साऊथ एशिया सर्वोत्कृष्ट इन्होवेशन पुरस्कार – लोकसत्ता
July 22, 2012
नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल मोबाईल कॉंग्रेस अर्थात आंतरराष्ट्रीय भ्रमणध्वनी महासंमेलनात नाशिकच्या खांडबहाले डॉट कॉमच्या बहुभाषिय लघुसंदेश शब्दकोषाला शिक्षण आणि अध्ययन विभागात साऊथ एशिया बेस्ट मोबाईल इनोव्हेशन ऍवॉर्ड प्रदान करण्यात आला. विविध अकरा गटामध्ये हे पुरस्कार देण्यात आले. बांगलादेश, श्रीलंका, भूतान, मालदीव, अफगाणिस्तान, नेपाळ व हिंदुस्थानातील नामांकित कंपन्या स्पर्धेत सहभागी होत्या.