संस्कृतच्या संवर्धनासाठी जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू

संस्कृत भाषा अर्थात देववाणीच्या संवर्धनासाठी जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओसंस्कृत भारती’  सुरू झाला आहे. भाषा शब्दकोशांचे संशोधक, नाशिकचे सुपुत्र सुनील खांडबहाले यांच्याखांडबहाले डॉट कॉमने ही कामगिरी केली असून गुरुवारी जागतिक संस्कृतदिनी ऑनलाइन प्रसारित करण्यात आला.

संस्कृत शिकण्याची  इच्छा असूनही ती सातत्याने ऐकता येईल असे इंटरनेट जगतात आजही व्यासपीठ नाही. त्यामुळे अनेकांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागते. त्याची दखल घेतखांडबहाले डॉट कॉमया तंत्रज्ञान विकास संस्थेने संस्कृत भाषा संवर्धन व प्रचारप्रसारणासाठी 24 तास संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू केला आहे. मी संस्कृत भारतीचा विद्यार्थी आहे. संस्कृत भाषा शिकत असताना वर्गात संस्कृतचे शब्द कानावर पडायचे; मात्र वर्गाबाहेर आल्यानंतर ते शब्दच ऐकायला मिळायचे नाहीत. संस्कृत श्लोक, स्तोत्रे, गीते इंटरनेटवर आहेत, पण ती अस्ताव्यस्त स्वरूपात असल्याचे सुनील खांडबहाले यांनी सांगितले. पण व्यावहारिक जीवनाशी संबंध सांगता येईल, संवादात्मक संस्कृत अध्ययनपूरक साहित्य संपादन करून24 तास ऐकता येईल अशी काहीतरी व्यवस्था सुरू करण्याची गरज मला वाटू लागल्याचे त्यांनी सांगितले. या गरजेतूनच मी इंटरनेट रेडिओ डिझाइन केला होता.

इंटरनेटवरील पहिला कम्युनिटी रेडिओ 

लोकसहभागातून प्रसारित केला जाणारा संस्कृत भारती हा जगातील पहिला कम्युनिटी इंटरनेट रेडिओ आहे. यासाठी कोणतेही सॉप्टवेअर अथवा ऍप डाउनलोड करावे लागत नाही. आपले काम करत असतानाच सहजपणे स्मार्टफोन, टॅबलेट, संगणकावर हा रेडिओ सहजपणे लावता येतो.  – सुनील खांडबहाले

News Link :

https://www.saamana.com/world-first-sanskrit-internet-radio-starts/

Sidebar