मोबाईल डिक्शनरी – लोकसत्ता

गरज असेल तेव्हा तात्काळ संदर्भ उपलब्ध व्हावा हा शब्दकोशाचा मूळ हेतू डोळ्यासमोर ठेवून कुठेही, कधीही सहजपणे वापरता येण्याजोगी जगातली सर्वप्रथम ‘इंग्लीश-मराठी मोबाईल डिक्शनरी’ नाशिक येथील खांडबहाले डॉट कॉमने विकसित केली आहे. विशेष म्हणजे, इंग्रजी व मराठी मिळून तब्बल दीड लाख शब्दसंपदा असणारी ही डिक्शनरी मोबाईल फोनच्या मेमरीतील अत्यंत कमी म्हणजे एखाद्या रिंगटोन एवढीच जागा व्यापते. नोकियातर्फे या डिक्शनरीला बेस्ट रिजनल लँग्वेज अ‍ॅप्लीकेशनचा बहुमानही प्रदान करण्यात आला आहे.

Sidebar