डिजिटल डिक्शनरीकार – साप्ताहिक सकाळ
मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली मुले कितीही बुद्धिमान असली तरी त्यांची गोची होते ती इंग्रजीतून संवाद साधताना. इंग्रजी शब्दसंग्रह उत्तम असेल तर या अडचणीवर मात करता येते, हे लक्षात आल्यावर नाशिकजवळच्या एका छोट्या खेड्यातील सुनील खांडबहाले या तरुणाने शब्दकोशांशी मैत्री केली. पुढे माहिती- तंत्रज्ञानात नवनवे प्रयोग करत त्याने कॉम्प्युटर, सीडी, इंटरनेट; तसेच मोबाइलमध्येही भारतीय भाषांमधले शब्दकोश युजर फ्रेंडली रूपात आणले. दीडशे देशांतील जवळपास चार कोटी लोक आज सुनीलच्या ऑनलाइन डिक्शनरीशी जोडले गेले आहेत. मायक्रोसॉफ्ट, गुगलसारख्या कंपन्याही सुनीलबरोबर काम करण्यास उत्सुक आहेत.

Comments
So empty here ... leave a comment!