खांडबहाले यांना टेड इंक आंतरराष्ट्रीय फेलोशिप – दिव्य मराठी

शब्दकोश संकेतस्थळाचे निर्माते नाशिकचे सुनील खांडबहाले यांना आंतरराष्ट्रीय टेड इंक (TED INK) फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या 13 वर्षांत त्यांनी एकूण 22 भारतीय भाषांमध्ये संगणक, मोबाइल, टॅब्लेट, इंटरनेट तसेच लघुसंदेश प्रणालीवर कार्य करणार्‍या विविध शब्दकोशांची निर्मिती करून सामाजिक भावनेतून ते सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिले. स्वत:पासून सुरू झालेला त्यांचा हा शब्दप्रवास जगभरातील 150 देशांमध्ये तब्बल 10 कोटीहून अधिक लोकांपर्यंत त्यांनी पोहोचविला. त्याबद्दल त्यांना ही फेलोशिप देण्यात आली आहे.

Sidebar