खांडबहाले.कॉम च्या एसएमएस डिक्शनरीला साऊथ एशिया सर्वोत्कृष्ठ इनोव्हेशन पुरस्कार – सामना
नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल मोबाईल कॉंग्रेस अर्थात आंतरराष्ट्रीय भ्रमणध्वनी महासंमेलनात नाशिकच्या खांडबहाले डॉट कॉमच्या बहुभाषिय लघुसंदेश शब्दकोषाला शिक्षण आणि अध्ययन विभागात साऊथ एशिया बेस्ट मोबाईल इनोव्हेशन ऍवॉर्ड प्रदान करण्यात आला. विविध अकरा गटामध्ये हे पुरस्कार देण्यात आले. बांगलादेश, श्रीलंका, भूतान, मालदीव, अफगाणिस्तान, नेपाळ व हिंदुस्थानातील नामांकित कंपन्या स्पर्धेत सहभागी होत्या. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीकोन समोर ठेवून विनानफा तत्त्वावर खांडबहाले डॉट कॉमच्या सुनील खांडबहाले यांना बहुभाषिय लघुसंदेश शब्दकोष (एसएमएस डिक्शनरी) तयार केला.

Comments
So empty here ... leave a comment!